विद्यासागर कला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न

रामटेक –   विद्यासागर कला महाविद्यालय खैरी  (बिजेवाडा) रामटेक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले महिला अद्यसन व रोजगार मार्गदर्शन केंद्र व महिला तक्रार निवारण समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्योती कवठे यांनी केले. कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान डॉ.पूनम लाड यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश महल्ले यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणूनच आज सर्वसामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आलेला आहे. स्त्रियांच्या जीवनात आज जो आमूलाग्र बदल झालेला आहे त्याला कारणीभूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच आहेत असे प्रतिपादन यांनी केले. प्रा. अनिल दाणी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्य आणि कर्तृत्वाबद्दल माहिती सांगितली.या प्रसंगी  डॉ रवींद्र पानतावणे, डॉ. आशिष ठाणेकर,डॉ. विलास जायभाई, डॉ. गिरीश सपाटे, डॉ. सुरेश सोमकुवर , विनोद परतेती,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी वृंद,रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.आभार आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Chahat Pahuja & Sanskar Mishra leaves an impactful impression on Shark Tank India with their premium customised streetwear brand ‘Farda’

Wed Jan 5 , 2022
Over the last decade, India has been steadily emerging as one of the largest and most vibrant start-up ecosystems in the world. Giving a golden opportunity to make it big, Sony Entertainment Television latest offering, Shark Tank India is providing a life changing platform for business aspirants to turn their entrepreneurial dreams into reality by pitching their innovative ideas to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com