विधानसभा निवडणूक 2024 – निवडणूक आयोगामार्फत आज (दि.6) होणार नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागातील तयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर :- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्यावतीने वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील मतदान पूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी बुधवार दि.6 रोजी आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी आज दिली.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती विभागांची ही आढावा बैठक बुधवार दि.6 रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी 2 यावेळेत स्मार्ट सिटी कार्यालय सभागृह, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार, संजय कुमार, प्रधान सचिव अविनाशकुमार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, अनिलकुमार आदी मान्यवर तसेच छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, परीक्षेत्र महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, आयुक्त आदी सहभागी होणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार

Wed Nov 6 , 2024
मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ पुरुष मतदार, २ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदार, तसेच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. पुणे येथे ८८ हजार ९३७ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com