विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

नागपूर :- वैवैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला.

धामणगाव रेल्वे मतदार संघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेश वाघमारे,गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज देशमुख,ओमजी सोनी, हरिश्चंद्र खंडाळकर,दिनेश ठाकरे, सुरेखा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की,विदर्भातील दुष्काळग्रस्त परिस्थिती बदलण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. यामुळे या भागातील स्थिती पूर्णपणे बदलून जात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल. 88 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाची घोषणा केल्यावर अनेकांनी त्यावर अविश्वास व्यक्त केला.पण मी प्रकल्प मंजूर केला आणि त्याच्या निविदाही काढल्या.

आमचे महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. महायुती सरकारच्या एका रुपयात पीक विमा योजनेत 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. पुढच्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळेल. पुन्हा एकदा सरकार आल्यावर पूर्णपणे कर्जमाफी दिली जाईल. हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आ.प्रताप अडसड यांनी आपल्या वक्तृत्वाने विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडून जनतेला न्याय मिळवून दिला. केवळ अडीच वर्षात त्यांनी 2300 कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघात आणत अनेक प्रकल्प राबवण्याचे काम केले. त्यातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. सतरा तीर्थक्षेत्रांना पाच – पाच कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून आले.पाथरगाव सिंचन योजनेसाठी 55 कोटी रुपये दिले आणि ती योजना पूर्णत्वास नेली. विदर्भातील एकाच मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांना इतका निधी मिळण्याचे हे एकमेव उदाहरण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना मूर्ख बनवले. पण आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो. सगळे नियम बाजूला ठेवून धामक च्या पुनर्वसनाचे काम पार पाडले. जी आश्वासने दिली ती शंभर टक्के पूर्ण करणार अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढी व परिसरात नैसर्गिक वातावरण ढगाळ मात्र राजकीय वातावरण तापले 

Tue Nov 12 , 2024
कोदामेंढी :- सध्या निवडणुकीच्या जोर संपूर्ण महाराष्ट्रसह जिल्हा जिल्ह्यात, तालुका तालुक्यात, गावा गावात सुरू असून कोदामेंढीतही नैसर्गिकरित्या वातावरण आज ढगाळ असले तरी राजकीय वातावरण मात्र उमेदवारांच्या प्रचाराने गावागावात काढत असलेल्या प्रभात फेऱ्याने, मुख्य रस्त्याच्या चौकालगत ,गावातील मुख्य ठिकाणी, वारडावारडात लावलेल्या उमेदवारांचे बॅनर, पोस्टर तसेच त्यांच्या प्रचारही सुरू असल्याने निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. कोदामेंढी हे गाव कामठी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com