घरोघरी अधिकारी अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदार यादी पडताळणी

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांची 100 टक्के मतदार यादीत नाव नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृह भेटींतर्गत गृहनिर्माण संस्थांमध्ये “मतदार नोंदणी विशेष अभियान” व “घरोघरी अधिकारी” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व इतर कर्मचारी जिल्ह्यातील विविध संस्थांना भेटी देत आहेत.

या अभियानांतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ-147 च्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मतदार यादीमध्ये नाव असल्याची पडताळणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे गृहनिर्माण संस्थेमध्ये व्यक्त‍िशः जाऊन मतदार नोंदणीची प्रक्रिया, मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्ती. मृत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, अस्पष्ट छायाचित्रे अद्यावत करणे इत्यादी कार्यवाही करून अचूक, अद्ययावत व निर्दोष मतदार यादी तयार करण्याचे काम करीत आहेत.

ठाणे जिल्ह्यामध्ये २८ हजार ३४६ इतक्या गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आहेत. या संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के नोंदणी होणे आवश्यक आहे. या संस्थांमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदार यादीमध्ये होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी विशेष अभियान राबवीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित

Tue Aug 22 , 2023
ठाणे :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ. दिलीप सपाटे, जयेश सामंत आणि विभव बिरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.            ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.20 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com