वेगाव येथील कबड्डी स्पर्धेत आजनी चे रेणुका क्रीडा मंडळ विजयी

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 13:- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील
वेगाव येथे नुकतेच १० ते १२ मार्च २०२२ पर्यंत जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब द्वारा महिला आणि पुरुषांचे भव्य विदर्भ स्तरीय कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते.पुरुषांच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे तर महिलांच्या स्पर्धेसाठी २१ हजारांचे पहिले बक्षीस ठेवण्यात आले होते.
या स्पर्धेत कामठी तालुक्यातील आजनी येथील नुकतेच नव्याने कोच राहुल शेळके यांच्या परिश्रमातून तयार झालेल्या रेणुका महिला क्रीडा मंडळाने कॅप्टन कुमारी शीतल खुरपडी हिच्या मार्गदर्शनात प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे बक्षीस पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आपल्या चिकाटीच्या बळावर अंतिम सामन्यात रेणुका क्रीडा मंडळाने श्रीराम बालक आखाडा बल्लारशा या क्रीडा मंडळाला हरवून प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरल्याबद्दल सर्व खेळाडूंचे कोच राहुल शेळके, मार्गदर्शक शेषरावजी दवंडे, उमेश भाऊ मस्के, घनश्याम चकोले, दिनेश मेश्राम, लिलाधर दवंडे, नरेश जीवतोडे, मधुकर ठाकरे, दत्तू सोनटक्के, बंटी नारनवरे, रजत विघे, बबलू नागोसे, कावळे आणि मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

SNG BASKETBALL LEAGUE 2022

Sun Mar 13 , 2022
Above 13 Girls Finals: – Team Billboards (Manjari Padhye 8) beats Team Vision Sports (Dhviti Sanghani 18). Final Score: – 21-19 Above 13 Boys: – Team Multifit Gallants (Sumedh Nipane 7, Neerav Naidu 7) beats Team IGCS (Suyesh Gokhale 8, Rakshit Wahane 7) Final Score: 26-21 Under 13 Girls: – Team Hansa Groups (Kanishka Mande 10) beats Team Landmark (Riddhi […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!