नागपूर :- वीर साहिबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांचया शौर्य आणि बलिदानास विभागीय आयुक्त कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
२६ डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वीर साहिबजादे यांच्या प्रतिमेला उपायुक्त मनोज शहा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक आयुक्त संघमित्रा ढोके, लेखाधिकारी रत्नाकर पागोटे तसेच विभागीय आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.