कामठी तालुक्यात वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो.सृष्टीतील प्रत्येक सजीव , निर्जीवरप पूजनीय आहे.सारे सणवार ही एक प्रतिके आहेत.समाजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सुदृढ समाज दीर्घकाळ टिकावा या मुख्य उद्देशाने स्त्रीयांचा खास मानला जाणारा वटसावित्री उत्सव कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपलया पतीला उत्तम आरोग्य , दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वट सावित्रीची पूजा करण्यात आली.यावेळी वट वृक्षांची पूजा व प्रार्थना करण्यात आली. या सनाविषयी जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार सावित्रीच्या पतीचे प्राण हरण करण्याकरिया यमराज आला असता तिने पती बरोबरच जाण्याचा हट्ट धरला यमराज स सावित्रीने मागितलेल्या तीन वरास यमाने तथास्तु म्हटल्यामुळे यमास सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हूणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात याच आख्यायिके नुसार आजही वटपौर्णिमेला विवाहितस्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करून त्याभोवती प्रदक्षिणा घातली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 जुलैपासुन मनपातर्फे " आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेचे "आयोजन

Fri Jun 21 , 2024
– नोंदणी सुरु,मिळणार रोख बक्षिसे – गट बनवुन घेता येणार सहभाग चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान ” आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धा ” आयोजीत करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील प्रत्येक उपलब्ध मोकळ्या जागेत वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे. अलीकडच्या काही वर्षात सातत्याने होणाऱ्या तापमान वाढीने काय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!