वत्सल, ऋग्वेद रोप स्किपिंगचे चॅम्पियन, खासदार क्रीडा महोत्सव 

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रोप स्किपिंग स्पर्धेत वत्सल किरटकर आणि ऋग्वेद किरटकर चॅम्पियन ठरले. झिरो मॉईल मेट्रो स्टेशन येथे शनिवारी झालेल्या स्पर्धेत १२ वर्षाखालील वयोगटात वत्सल तर १२ वर्षावरील वयोगटात ऋग्वेदने सुवर्ण पदक पटकाविले. १२ वर्षाखालील वयोगटात हनी यादव आणि समीर बिजेवार ने तर १२ वर्षावरील वयोगटात रिया भंडारकर आणि अजितेश झलके ने रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले.

स्पर्धेत सुमारे 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. शनिवारी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार गिरीश व्यास, नागपूर रोप स्किपिंग असोसिएशनचे संचालक डॉ. तेजिंदर सिंह रावल, महा मेट्रो चे स्ट्रेटेजिक प्लानिंग अधिकारी अनिल कोकाटे, स्पर्धेचे कन्व्हेयर सुनील मानेकर, संयोजक  कृष्णा पांडे, असोसिएशनचे प्रतिनिधी आशीष देशपांडे, सवित वालदे, अनिकेत रामटेके उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोप स्किपिंगचे परीक्षक मोनाली देशपांडे, विभावरी वालदे, आशीष डे, भूषण मैदुले, उर्मिला विद्याभानू , प्रणिता लांजेवार, नरेश निमजे, जावेद खान, श्रद्धा देशपांडे, भाविका रामटेके, स्वप्निल शेंडे, सतेंद्र, श्रुतिका उके, मानश्री अंबाडे आदींनी सहकार्य केले.

निकाल 

१२ वर्षाखालील वयोगट  

१. वत्सल किरटकर

२. हनी यादव

३. समीर बिजेवार

१२ वर्षावरील वयोगट 

१. ऋग्वेद किरटकर

२. रिया भंडारकर

३. अजितेश झलके

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेना दिवस पर जरूरतमंद विधवाओं और विकलांग भूतपूर्व सैनिकों का सम्मान किया

Mon Jan 16 , 2023
नागपुर :- सेना दिवस के शुभ अवसर पर मुख्यालय उत्तर महाराष्ट्र और गुजरात उप क्षेत्र, नागपुर ने जरूरतमंद विधवाओं एवम विकलांग भूतपूर्व सैनिकों को सम्मानित करने के लिए महाराष्ट्र और गुजरात राज्यों के 10 जिलों जिसमें भूसावल, नागपुर, पुलगॉंव, देवलाली, गॉंधीनगर, अहमदाबाद, धरंगधारा, वडोदरा, जामनगर और भुज में दिनॉंक 16 जनवरी 2023 एक समारोह आयोजित किया गया ।   उप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!