संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17:- तथागत गौतम बुद्धाचा जन्म, त्यांची बुद्धत्व प्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण या घटना वैशाख बुद्ध पौर्णिमेला घडलेल्या आहेत.त्यामुळे वैशाख पौर्णिमेचा दिवस हा जगातील सर्व बौद्ध अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा व मंगलमय असा दिवस असल्याचे मौलिक वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले तसेच या पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्ती वर प्रकाश टाकत बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मविषयक भूमिकेनुसार अरिय अष्टांगिक मार्गाचे पालन करून शील सदाचार युक्त समाजाची निर्मिती हे बुद्ध धम्म संदेश समिती चे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले.
येरखेडा येथे बुद्ध धम्म संदेश समिती येरखेडा च्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहारात आयोजित वैशाख बुद्ध पोर्णिमा भव्य कँडल मार्च च्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक दिल्ली चे भन्तेजी वेन रुपानंद थेरो,नागपूर चे भन्ते प्रज्ञा भद्र व भिक्कु संघ, नागपुर जी पचे माजी जि प सदस्य सरिताताई रंगारी, माजी सभापती वसंतराव काळे, अनिल नगरारे, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, माजी सभापती नीरज लोणारे, कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, समाजसेवक धीरज मेश्राम, अमीत भोयर,प्रभाकर शिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 16 मे ला सायंकाळी सहा वाजता येरखेडा येथिल बुद्ध धम्म संदेश समिती च्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहार येथून भव्य कँडल मार्च काढण्यात आले.या भव्य कँडल मार्चच्या पूर्वी सायंकाळी 4 वाजता परित्राण पाठ करण्यात आले त्यानंतर या कँडल मार्च चा शुभारंभ विशेष बुद्ध वंदना व घेऊन करण्यात आले. हे कँडल मार्च प्रमुख मार्गाने भ्रमण करीत धम्महावीरानुवत्र बुद्ध विहारात कँडल मार्च चे समापन करण्यात आले.
या कँडल मार्च मधून तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या शांती , करुणा व अहिंसेचा संदेश देण्यात आला. दरम्यान या परिसरात बौद्धमय मंगलमय वातावरणाची निर्मिती झाल्याचा अनुभव अनुयायांनी घेतला. तर भव्य भोजनदान वितरणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक बुद्ध धम्म संदेश समिती चे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष गौतम तपासे,सुमेध दुपारे, सचिव गौतम पाटील,सहसचिव कल्पना तांबे, भरत सहारे, कमलेश बागडे तसेच सदस्य नवनीत सहारे,योगेश भगत,आशिष बावंनगडे,शुभम बावंनगडे, राहुल पाटील, आशिष मेंढे,धिरज तांबे,शुभम कानफाडे , विलेश वाघमारे,अश्विन पाटील, क्षितिज लांजेवार, योगेश भगत ,सुशील लांजेवार, आजिंक्य पाटील, रोहित पाटील, हर्ष कांनफाडे तसेच बुद्ध धम्म संदेश समिती महिला मंडळ च्या समस्त सदस्यांचा विशेष सहभाग राहला.