अरोली :- येथून जवळच असणाऱ्या कोदामेंढी येथील वार्ड क्रमांक चार चे रहिवासी अविवाहित वैभव अशोक हटवार (29) यांचे आज 24 फेब्रुवारी सोमवार ला रात्री दोन वाजून पंधरा च्या दरम्यान अल्पशा आजाराने नागपूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. ते भारतीय जनता युवा मोर्चा मौदा तालुका अध्यक्ष होते. भाजप नेते अशोक हटवार व माजी जिल्हा परिषद सदस्य शकुंतला अशोक हटवार यांचे ते कनिष्ठ मुलं होत. त्यांच्या पश्चात आई-वडील ,भाऊ,बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या धक्कादायक व अवेळीच निधनाने संपूर्ण गावासह तालुक्यात शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळलेला होता.