नागपूर : कौशल्य विकास, रोजगार विभागाच्या आयुक्तालयाच्या निर्देशानुसार रिक्तपदे अधिसूचित सक्ती करणारा कायदा, 1959 अन्वये जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी शासनाच्या महास्वयंम या संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करुन त्रैमासिक अहवाल इ-आर-1 ऑनलाईन पध्दतीने नियमित भरणे व पदे अधिसूचित करणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हयातील अनेक आस्थापनांनी आजतागायत शासनाचे संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रीया पूर्ण केलेली नाही. याबाबत सर्व कार्यालयाच्या आस्थापनांनी तत्काळ संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन माहिती भरावी. ज्या आस्थापना नोंदणी प्रक्रीया पूर्ण करणार नाही. अशा आस्थापनाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी ज्या आस्थापनांकडे 10 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व आस्थापनांनी तात्काळ www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रीया एक आठवडयाचे आत पूर्ण करुन घ्यावी. ज्या आस्थापना नोंदणी प्रक्रीया पूर्ण करणार नाही. अशा आस्थापनावर कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. तांत्रिक सल्ला व मार्गदर्शनासाठी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ज्योती वासुरकर यांचेशी दुरध्वनी क्र. 0712-2531213 वर संपर्क साधावा