नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कृष्णा मोहड व रजत महाजन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. छत्रपती नगर येथील संभाजी पार्कमध्ये ही स्पर्धा पार पडली.
रायफल प्रकारामध्ये कृष्णा मोहड आणि क्रिष्णा शेळके यांच्यात अंतिम सामना झाला. यात कृष्णा ‘चॅम्पियन’ ठरला तर क्रिष्णा शेळके ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पिस्टल प्रकारात रजत महाजन ने मोहम्मद अतहर ला मात देत ‘चॅम्पियन’चा खिताब पटकाविला.
एअर रायफल प्रकारात महिलांमध्ये समिक्षा नरसिंगवार विजेती ठरली. कनक जैस्वाल ला उपविजेतपदावर आणि धरणी दोरहाडा ला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एअर पिस्टलमध्ये पुरुष गटात मोहम्मद अतहर ने पहिले, अदनान अली ने दुसरे आणि शशांक केडवतकर ने तिसरे स्थान प्राप्त केले. महिलांमध्ये प्रमेशा झाडे पहिली ठरली. अनीशा राउत व पुष्पलता मनुष्मा यांनी दुसरे आणि तिसरे स्थान पटकाविले.
निकाल
एअर रायफल
१४ वर्षाखालील मुले : सात्विक माणुसमारे, शौर्य भांडारकर, राघव नागुलवार
१४ वर्षाखालील मुली : रिद्जीमा श्रीवास्तव, सनाया बाघडे, कृतीका खारपसे
१८ वर्षाखालील मुले : हिमांशू गभणे, प्रथमेश मेंडेवार, सिद्धेश द्रवेकर
१८ वर्षाखालील मुली : धरणी दोरहाडा, अर्णवी खोब्रागडे, सनाया बाघडे
२१ वर्षाखालील मुले : कृष्णा मोहड, हिमांशू गभणे, प्रथमेश मेंडेवार
२१ वर्षाखालील मुली : धरणी दोरहाडा, धनश्री कांबडे, अर्णवी खोब्रागडे
पुरुष : कृष्णा मोहड, क्रिष्णा शेळके, प्रथमेश नामपल्लीवार
महिला : समिक्षा नरसिंगवार, कनक जैस्वाल, धरणी दोरहाडा
एअर पिस्टल
१४ वर्षाखालील मुली : हरलीन कौर
१८ वर्षाखालील मुले : अदनान अली, क्रिष्णा सोनी, वीर चौधरी
१८ वर्षाखालील मुली : प्रमेशा झाडे
२१ वर्षाखालील मुले : अदनान अली, वीर चौधरी, जय पांडे
२१ वर्षाखालील मुली : प्रमेशा झाडे, विधी चौहान
पुरुष : मोहम्मद अतहर, अदनान अली, शशांक केडवतकर
महिला :प्रमेशा झाडे, अनीशा राउत, पुष्पलता मनुष्मा