उत्तम शेवडे बसपा चे पुन्हा प्रदेश मिडिया प्रभारी  – बसपा नेत्यांचे अभिनंदन 

नागपुर – बहुजन समाज पार्टी चे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी डॉ अशोक सिद्धार्थ यांनी 1 सप्टेंबरला नागपूरातील बसपा च्या शासक बनो… कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बसपाचे ज्येष्ठ मिशनरी कार्यकर्ते उत्तम शेवडे यांना प्रदेश मीडिया प्रभारी म्हणून घोषित केल्याने उत्तम शेवडे यांनी बसपा नेत्यांचे अभिनंदन केले .

उत्तम शेवडे हे 14 एप्रिल 1984 पासून स्थापन झालेल्या बसपाचे सक्रिय कार्यकर्ते असून , मिशनशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील सर्व मीडियाचे प्रतिनिधित्व करीत आलेले आहेत . उत्तम शेवडे यांनी श्रीकृष्ण उबाळे, सिद्धार्थ पाटील , राहुल तेलंग, विलास गरुड , सुरेश साखरे आदी प्रदेशाध्यक्ष यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी व प्रदेश कार्यालयीन सचिव म्हणून पक्षाचे काम सांभाळलेले आहे. शेवडे हे अभ्यासू, उच्च शिक्षित, हजर जबाबी, स्पस्टवक्ते, प्रामाणिक व कांशीराम साहेबांच्या तालमितील असल्याने ते पक्षाबाहेरील किव्हा पक्षातील दलालांनाही घाबरत नाहीत.

हल्लीचे प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने यांच्या कारकिर्दीतही त्यांच्यावर वरिष्ठांनी ही जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मायावतीजी ह्यांनी पक्षातील मीडिया प्रभारी ही पदे गोठविली होती. अलीकडेच ती पुन्हा बहाल केली. त्यामुळे उत्तम शेवडे यांनी बसपाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी, राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंदजी, राष्ट्रीय महासचिव डॉ अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंग, प्रमोद रैना, एड सुनिल डोंगरे, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने यांचे तसेच राज्यभरातून मागील दोन दिवसापासून मीडिया प्रभारी म्हणून माझे अभिनंदन करणाऱ्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे व हीतचिंतकाचे धन्यवाद मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

Sun Sep 4 , 2022
मुंबई दि. 3: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन अजित डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com