अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे चुरडी येथे पूर बंदोबस्त पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली की सतत सुरु असलेल्या अतिवृष्टी मुळे आज अचानक कैलास शामदींन प्रजापती, चुरडी यांचे राहते घरात पुराचे पाणी शिरले. संपूर्ण कुटुंबियांसोबत आपल्या घराचे छप्पर वर चढले. पुराचे पाणी सतत वाढत असल्याने जीव वाचविण्याकरिता कुटुंबातील सदस्य यांनी आरडा ओरड केल्यामुळे शेजारच्या नागरिक मदतीला धावले त्याच्या कुटुंबातील एकूण 6 सदस्य यांना पुराचे पाण्यातून सुरक्षित ठिकाणी काढले. त्यानंतर योगेश पारधी पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा यांनी प्रत्यक्ष कैलास श्यामदिन प्रजापती रा. चुरडी यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत मदतीबाबत चर्चा केली. पुरामध्ये घरचे सामान काढायला वेळ मिळाला नसल्याने प्रजापती यांच्या घरातील संपूर्ण सामान पुरात वाहून गेले. मानवतेच्या दृष्टीने मदत म्हणून पोलीस स्टेशन तिरोडा कडून तातडीची मदत म्हणून किराणा राशन मदत करण्यात आली. यावेळी पल्लवी भोयर, सरपंच कविता मुरे, पोलीस पाटील, पोलीस स्टेशन तिरोडा नापोशी मोहित चौधरी, चालक पो. शि हिरापुरे यावेळी उपस्थित होते.