आधारकार्ड अपडेट करून मोबाइल क्रमांक (लिंक) जोडावा – तहसीलदार राजू रणवीर

– संजय गांधी’ व ‘श्रावण बाळ’साठी आधार अपडेट करून मोबाईल सोबत जोडणे सक्तीचे!*

– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आदेश;

 – लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर मिळणार पैसे

– ३१जानेवारी शेवटची तारीख

कोंढाळी/-काटोल :- निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट ‘डीबीटी’ मार्फत या निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यासाठी आधारकार्ड अपडेट करून मोबाइल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यभर सुरू करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यात सुद्धा हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२५ची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यासह विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी यापूर्वी काटोल चे तहसीलदार यांचेकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता; तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत फेर्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचार्यांची कसरतही थांबणार आहे. सरकारच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड ला मोबाइल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. निराधार व्यक्तींना आता कागदपत्रे अपडेट करून घ्यावी लागतील. बहुतेक व्यक्तींना आधारकार्ड, बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक करावा लागेल. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात, असी माहिती काटोल तालुक्याचे तहसीलदार राजू रणवीर व संजय गांधी निराधार अनुदान योजने चे अधिकृत अधिकारी नायब तहसीलदार भागवत पाटील यांनी दिली आहे.

काटोल तालुक्यात या योजनेच्या अंतर्गत एकूण २६०००हजार लाभार्थी आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचे आज भूमिपूजन

Sat Jan 11 , 2025
नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे सहावे उद्यम प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत आंध्र असोसिएशन, अमृत भवन, सीताबर्डी, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या भूमिपूजनाचा सोहळा शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. हा सोहळा प्रसिद्ध उद्योगपती भगवानजी नारददेलवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. ग्रामायण प्रतिष्ठान 2012 पासून ग्रामीण भागातील विविध उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!