संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कन्हान रेल्वे मार्गावरील अपलाईन रेल्वे रुळाच्या बाजूला पोल क्र 1113/19-21 च्या मधात साई मंदिर जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आज सकाळी साडे नऊ दरम्यान आढळला असून सदर मृत्यू प्रकरण हे नागपूर कडे धावत्या रेल्वे गाडीच्या धडकेने वा रेल्वे गाडीतून खाली पडून मृत्यु झाला असावा तर्क लावण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मृतकाची अजूनही ओळख पटली नसून पोलिसांनी तूर्तास घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस संजय पिल्ले करीत आहेत.