अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर पोलो (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती – गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर येथे 19 ते 21 मार्च, 2023 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर पोलो (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 08 ते 16 मार्च दरम्यान होणार आहे.

खेळाडूंमध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा यश दुर्गे व आदित्य थेटे, युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा विशाल महाजन, विद्यापीठातील पी.जी.टी.डी.कॉम्प्युटर सायन्सचा कौस्तूभ गाडगे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत सराफ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा हार्दिक प्रजापती, लवकेश उदापूरकर, चर्वाक भोंडे व पार्थ हिवसे, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत काकड, उत्कर्ष थोरात व आलोक देशमुख, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा संकेत साखरे, सुमित मोहोड, अनिरुध्द गुप्ता व अथर्व हिंगमिरे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा पार्थ अंबुलकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा राज उमाठे याचा समावेश आहे. सर्व खेळाडंूनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या ४० दुकानांवर मनपाची कारवाई  

Thu Mar 2 , 2023
ट्रॅफीक ऑफीस ते मुल रोडवर कारवाई   चंद्रपूर – शहरातील रस्‍त्‍यांवर अस्‍थायी स्‍वरुपाचे अतिक्रमण असल्‍यामुळे रस्त्यांचा श्वास कोंडला आहे. हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील ट्रॅफीक ऑफीस ते बंगाली कॅम्प ते मुल रोड येथील ४० दुकानांवर कारवाई करून साहीत्य जप्त केले आहे. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यास नागपूर रोड, बंगाली कॅम्प, गोल बाजार,दाताळा रोड,जटपुरा गेट ते रामनगर मार्ग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com