अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित समता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 8 ते 14 एप्रिल, 2023 या कालावधीत समता सप्ताह समारोह करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता समता दौड चे आयोजन केले होते. सदर दौड पंचवटी चौक स्थित डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली.
याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. रवींद्र कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही.जी. ठाकरे, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. मनिषा कोडापे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. तनुजा राऊत उपस्थित होते.
सदर दौडचा इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून समारोप झाला. समता दौडमध्ये 434 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. दौडमध्ये विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, तसेच शहरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग सहभागी झाले होते.
याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक आयोजक डॉ.संतोष बनसोड यांनी केले. संचालन प्रा. अभिजित इंगळे, तर आभारप्रदर्शन डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी केले.