अमरावती :-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणा-या सर्व संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक विभाग, प्रशासकीय केंद्र यांना कळविण्यात येते की, आपल्या महाविद्यालयांमधील ज्या विद्याथ्र्यांनी सत्र 2021-22 मध्ये राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव, मध्य/पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विविध युवा महोत्सव संघ, वैयक्तिक स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असेल, व ज्या विद्याथ्र्यांनी नैपुण्य प्राप्त करुन पदके मिळविली असतील, अशा विद्याथ्र्यांना विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट कलावंत म्हणून गौरविण्यात येणार असून अशा विद्याथ्र्यांची नावे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे 31 मार्च, 2023 पर्यंत पाठवावीत, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी मोबाईल क्रमांक 8600285857 वर संपर्क साधता येईल.
पुरस्काराकरीता महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नावे पाठविण्याचे विद्यापीठाचे आवाहन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com