केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपातच (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ या कालावधीत ना. नितीन गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

NADP, NAGPUR WINS THE STEVIE INTERNATIONAL AWARD AT ISTAMBUL

Fri Jan 17 , 2025
  Nagpur :- National Academy of Defence Production (NADP) has been awarded the prestigious Stevie International Award in Istanbul. The recognition from the Stevie Awards, renowned for celebrating outstanding achievements in the workplace, reflects NADP’s nearly 50-year legacy of innovation and dedication to enhancing the capabilities of defence professionals. The judges praised NADP for its commendable history in training officers, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!