– शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती उत्सवामध्ये सहभाग
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) शहरातील विविध ठिकाणी आयोजित शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
उत्तर नागपुरातील बोखारा फाटा (कोराडी नाका) या ठिकाणी हॉटेल एम.एच.-३१ मध्ये शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. ना. गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण कले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर महाल (गांधीगेट) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ना. गडकरी यांनी अभिवादन केले. तसेच मातृसेवा संघापुढे (महाल) आयोजित सोहळ्यालाही ना. गडकरी यांची उपस्थिती होती.
महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तिरंगा चौकात आयोजित शिवजयंती उत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ना. गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवभक्तांच्या उत्साहाचे कौतुक केले. त्यानंतर बेसा मार्गावरील परिवर्तन चौकात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवालाही ना. गडकरी यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत, भाजप नेते संजय भेंडे आदींची उपस्थिती होती.