केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांगांना ट्रायसिकलचे वितरण आज

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, सोमवार, दि. २६ ऑगस्टला नागपूर शहरातील अस्थिव्यंग दिव्यांगांना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण होणार आहे. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स (हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या शेजारी) येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने नागपूर शहरात अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी सौर ऊर्जा चलित मोटराईज्ड ट्रायसिकल उपलब्ध झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ना.गडकरी यांनी या ट्रायसिकलचे वितरण केले होते. आता लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. यासाठी विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) या संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे. ना. नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून या ट्रायसिकल उपलब्ध झाल्या आहेत.

या माध्यमातून दिव्यांगांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासही ट्रायसिकलच्या निमित्ताने बळ मिळणार आहे. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत दिला जाणार आहे. समायोजित (अॅडजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अश्लीलता के स्रोतों पर लगाई जाएं लगाम और बलात्कार में लिप्त दोषियों को दी जाएं कठोरतम सज़ाएं - संविधान चौक पर महिला संगठनों की हुंकार 

Mon Aug 26 , 2024
नागपुर :- देश में बलात्कार के बढ़ते मामलों को लेकर महिला सद्भावना मंच नागपुर , जमाअ़त ए इस्लामी हिंद नागपुर , विदर्भ मुल्कारिन संगठन,जागृति बहुउद्देशीय जनसमिति, ग्रौ उद्योग महिला समिति , ओबीसी महिला संगठना, महिला शक्ति मोर्चा एवं अन्य महिला संगठनों ने मिलकर संविधान चौक पर धरना प्रदर्शन किया ।‌ तत्पश्चात ज़िला तहसीलदार एवं ज़िला अधिकारी महोदय को अपना रोष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!