नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण व भूमिपूजन” शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राजे संभाजी चौक(नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती केले जाणार आहे.
याप्रसंगी आमदार सर्वश्री प्रविण दटके, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे डॉ. नितीन राऊत, विकास ठाकरे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहतील.
तरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, लीना उपाध्ये, डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी यावेळी केले आहे.