नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात १४ विविध खेळाचे मैदाने एकात्मीक पध्दतीने ‘नासुप्र’व्दारे विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी हनुमान नगर त्रिकोणी मैदान बास्केटबॉल ग्राउंडला मा. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री यांनी दिनाकं ०१ जानेवारी रोजी भेट दिली. त्यांचे स्वागत नासुप्रचे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’चे आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी श्री. नितीन गडकरी यांचे स्वागत केले. सदर मैदानात नॅशनल लेवलचे दोन बास्केटबाॅल कोर्टचे बांधकाम, चेंजींग रूम व टाॅयलेट ब्लाॅकचे बांधकाम, मैदान समतलीकरण, पेव्हींग ब्लाॅक लावणे, हायमाश्ट/विद्युत लाईट ही कामे पुर्ण झालेली असुन खेळाडू सराव करीत आहेत. अशी माहिती नितीन गडकरी यांना भेटीदरम्यान देण्यात आली.
यावेळी नितीनज गडकरी यांनी खेळाडुंसोबत संवाद साधुन त्यांना मोबाईलमध्ये गेम खळणे बंद करून मैदानात दररोज खेळण्यास प्रोत्साहीत केले. तसेच खेळाडुंच्या पालकांकडुन त्याच्यासाठी काय सुवीधा मैदानात करता येईल याबाबत मत जानून घेतले, पालकांनी केलेल्या विनंतीवरून सदर मैदानात ग्रीन जीम लावून देण्याबाबत व बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. खेळाडुंच्या आग्रहावरून मा.मंत्री महोदयांनी बास्केटमध्ये बाॅल टाकताच खेळाडु व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर नितीन गडकरी, यांनी सदर मैदानाचा झालेल्या विकासावर समाधान व्यक्त केले व खेळाडूंना नववर्षाच्या व उज्वल भविष्याकरिता शुभेच्या दिल्या. यावेळी हनुमानगर क्रिडा मंडळाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडु श्री. शीरपूरकर व श्री. पोहेकर उपस्थित होते.
