“गगनयान” चाचणी वाहन अंतराळयान म्हणजेच “गगनयान” चाचणी वाहन विकासयानाचे (टीव्ही-डी1) प्रक्षेपण 21 ऑक्टोबर रोजी नियोजित असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

– अंतिम मानवी अंतराळ मोहीम “गगनयान” पूर्वी, पुढील वर्षी होणाऱ्या चाचणी उड्डाणात “व्योममित्र” या महिला रोबो अंतराळवीराला नेणार

नवी दिल्ली :- “गगनयान” चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण, म्हणजेच “गगनयान” चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण या महिन्याच्या 21 तारखेला होणार आहे.

चांद्रयान मोहिमेशी संबंधित इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.

इस्रो “गगनयान” मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या क्रू एस्केप प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी देखील करेल, परिणामी 2024 पर्यंत मानवरहित आणि मानवीय अंतराळ मोहीमा होतील. ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात केली जाणार आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल.

चाचणीमध्ये बाह्य अवकाशात क्रू मॉड्यूलचे प्रक्षेपण करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या उपसागरात सुरक्षित उतरवून ताब्यात घेणे अंतर्भूत आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांनी मॉड्यूल पुनर्प्राप्त करण्यासाठी आधीच प्रात्यक्षिके सुरू केली आहेत.

या चाचणीच्या यशामुळे पहिल्या मानवरहित “गगनयान” मोहिमेचा टप्पा निश्चित होईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. अंतिम मानवी “गगनयान” अंतराळ मोहिमेपूर्वी, पुढील वर्षी चाचणी उड्डाण होणार आहे, ज्यामध्ये “व्योममित्र” या महिला रोबो अंतराळवीराला नेले जाईल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, भारताच्या अंतराळ मोहिमेची रचना किफायतशीर आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रो हे भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक आहे ज्यामध्ये महिला वैज्ञानिक केवळ सहभागी होत नाहीत तर अंतराळ संशोधन कार्यक्रमातील विविध उपक्रमांचे नेतृत्व देखील करतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पणजी येथील आयकर कार्यालयात खादी महोत्सवाचे आयोजन

Wed Oct 11 , 2023
पणजी :-स्थानिक कारागिरांना आधार देण्यासाठी आणि देशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य कार्यालय खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी), पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने खादी महोत्सवांतर्गत आयकर कार्यालयाच्या आवारात, आयकर भवन, पाटो, पणजी येथे खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रधान आयुक्त शाजी पी जेकब (आयआरएस) यांच्यासह आयकर विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com