– संशयित फसवणूक संप्रेषणाची तक्रार करण्यासाठी संचार साथी पोर्टलवर (https://www.sancharsaathi.gov.in) चक्षु सुविधा
नवी दिल्ली :- दळणवळण, रेल्वे, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या उपस्थितीत दूरसंचार विभागाच्या ‘डिजिटल इंटेलिजन्स मंचाचा प्रारंभ केला. सायबर-गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी हितसंबंधितांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने, हा मंच सुरू करण्यात आला आहे,संचार साथी पोर्टलवर ‘चक्षु’ सुविधा (https://sancharsaathi.gov.in), उपलब्ध करून देण्यात आली असून हा एक अग्रगण्य उपक्रम आहे आणि यामुळे नागरिकांना संशयित फसवणूक संप्रेषणाची सक्रियपणे तक्रार करता येणार आहे.
सुरक्षित भारत प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय, संघटनात्मक आणि वैयक्तिक अशा तीन स्तरांवर सायबर-फसवणूक रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे,असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच सायबर-फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अशाप्रकारच्या साधनांचा वापर करता येईल अनुषंगाने,जागरूकता पसरवण्यासाठी दूरसंचार विभागाने अनेक उपक्रम घेतले आहेत. वैष्णव यांनी या संदर्भात “संचार साथी” पोर्टलचा उल्लेख करत अशा हल्ल्यांचा यशस्वीपणे सामना करण्यास याची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.. आजची दोन पोर्टल्स- डिजिटल इंटेलिजन्स मंच आणि चक्षु सुविधे सोबतच, ही साधने कोणत्याही प्रकारच्या सायबर सुरक्षा धोक्याला आळा घालण्याची क्षमता आणि सामर्थ्य आणखी वाढवतील, याकडे वैष्णव यांनी लक्ष वेधले.
डिजिटल इंटेलिजेंस मंच (डीआयपी):
दूरसंचार विभागाने विकसित केलेला डिजिटल इंटेलिजन्स मंच (डीआयपी) हे प्रत्यक्ष वेळेतील माहिती सामायिक करणे, , माहितीची देवाणघेवाण आणि हितसंबंधितांमध्ये म्हणजे दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी), कायदा अंमलबजावणी संस्था (एलईए), बँका आणि वित्तीय संस्था (एफआय), समाजमाध्यम मंच, ओळख दस्तऐवज जारी करणारे प्राधिकरणे इ. यांच्याशी समन्वय साधण्यासाठी एक सुरक्षित आणि एकात्मिक मंच आहे. या पोर्टलमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापराशी संबंधित प्रकरणांची माहिती देखील उपलब्धआहे. सामायिक केलेली माहिती त्यांच्या संबंधित क्षेत्रामधील हितसंबंधितांसाठी उपयुक्त ठरू शकते.
हा मंच हितधारकांच्या कार्यवाहीसाठी संचार साथी पोर्टलवर नागरिकांनी केलेल्या विनंत्यांसाठी सहाय्यक माहिती भांडार म्हणूनही काम करते.
डीआयपी सुरक्षित कनेक्टिव्हिटीवर हितसंबंधितांसाठी प्रवेशयोग्य आहे आणि संबंधित माहिती त्यांच्या संबंधित भूमिकांच्या आधारे सामायिक केली जाते.सदर मंच नागरिकांना उपलब्ध नाही.
संचार साथी पोर्टलवर चक्षु सुविधा:
दूरसंचार विभागाच्या च्या संचार साथी पोर्टलवर आधीच उपलब्ध असलेल्या नागरिक केंद्रित सुविधांमध्ये चक्षु सुविधा ही नव्याने घातलेली भर आहे. केवायसी कालबाह्य होणे किंवा बँक खाते/पेमेंट वॉलेट/सिम/गॅस जोडणी/वीज जोडणी, लैंगिक शोषण, पैसे पाठवण्यासाठी सरकारी अधिकारी/नातेवाईक असल्याचे सांगत तोतयागिरी करणे , दूरसंचार विभागाद्वारे सर्व मोबाईल क्रमांकांची जोडणी तोडणे इ.यांसारख्या फसवणुकीच्या उद्देशाने कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर मिळालेल्या संशयित फसवणुकीच्या संप्रेषणाची तक्रार करण्याची सुविधा नागरिकांना चक्षु उपलब्ध करून देते.