वर्धा :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील गरीब, युवा, महिला आणि शेतकरी यांना केंद्रीकृत करून अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला बूस्ट मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ऍड. मेश्राम यांची वर्धा येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष पुढाकाराने आणि राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नाने महाराष्ट्राला भरीव तरतूद मिळाल्याचे भाजपा उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी सांगितले. वर्धा जिल्ह्यासाठी १६.५० हजार कोटीची भरीव तरतूद आहे. वर्धा, नांदेड, यवतमाळ हा रेल्वे प्रकल्प किंवा वर्ध्येच्या काठावर केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेला ड्रायपोर्ट हे सर्व वर्धा जिल्ह्याच्या विकासाला बूस्ट देईल, असा विश्वास ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ११ लक्ष, ११ हजार, ११ हजार करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे, मेट्रो, औद्योगिक कॉरीडोअर, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे उत्पादन, विपणन, वितरण यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. जगातील ११व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि लवकरच प्रगत देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था जाईल. देशातील गरीब, युवा, महिला आणि शेतकरी यांना या अर्थव्यवस्थेचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी ६०० कोटींचे विशेष पॅकेजची तरदूत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने मोठी तरतूद केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या माध्यमातून ५ लक्ष युवकांना विविध आस्थापनांमध्ये इंटर्न म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. भविष्यातील प्रगतीचे दारे प्रशस्त करणारा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने युवक, शेतकरी, महिला, गरिबांचे कल्याण साधन्याच्या दृष्टीने देखील भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्र शासनाच्या सर्व योजना आणि अर्थसंकल्पातील तरतुदींचा उपयोग व्यवस्थित केल्यास शेतकरी आत्महत्या कमी करता येतील. किंबहुना शेतकऱ्यांसाठी जोडधंदे देखील उभे करावे लागतील, अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मागील १० वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत,असेही ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, जिल्हा महामंत्री राहुलजी चोपडा, महिला मोर्चा ज़िल्हाध्यक्ष वैशाली येरावार, भाजप शहर अध्यक्ष निलेश पोहेकर, शहर उपाध्यक्ष प्रशांत झलके, जिल्हा मीडिया सेल संयोजक सारंग रघटाटे उपस्थित होते.