केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरीप हंगामासाठी सज्जतेचा घेतला आढावा

– खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी गरज केली व्यक्त

नवी दिल्ली :- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी खरीप हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. 2024 च्या खरीप हंगामासाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी भवनात आयोजित बैठकीत चौहान यांनी पिकांसाठी आवश्यक दर्जेदार साहित्याचा योग्य वेळेत पुरवठा करण्याचे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पुरवठा साखळीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर पेरणीला उशीर होतो आणि त्याचा दुष्परिणाम पिकाच्या उत्पादनावर दिसून येतो हे लक्षात घेऊन अडथळे टाळावेत, असे ते म्हणाले. सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या आणि शेतकऱ्यांना कष्टदायक परिस्थितीतून जावे लागू नये यासाठी सर्व प्रकारे उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. नैऋत्य मौसमी पाऊस यंदा सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याच्या अंदाजाबद्दल चौहान यांनी आनंद व्यक्त केला. खते विभाग, केंद्रीय जल आयोग आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या विभागाबद्दल सादरीकरण केले. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या सज्जतेविषयक माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यशाळेचे केले आयोजन

Sat Jun 15 , 2024
नवी दिल्ली :- 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तर्फे 14 जून 2024 रोजी पुणे येथील खडकवासला येथे कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेला तिन्ही सेवांमधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यशाळेचा एक भाग म्हणून,शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यशाळेत ध्यान, प्राणायाम, आसन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.भारतीय सशस्त्र दलातील प्रशिक्षित योग प्रशिक्षकांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com