कोदामेंढी :- शासनाच्या शिक्षण विभागाच्या नवीन जीआर नुसार आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम होत असतात. त्या अंतर्गत दिनांक 5/10/2024 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,तोंडली शाळेच्या मुख्याध्यापिका अनुुराधा धुर्डे, सहशिक्षक निलेश जाधव व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्र शाळा धानोली येथे परिसर भेटीचे आयोजन केले. तसेच तेथील प्रयोग शाळेला भेट दिली. यावेळी केंद्रप्रमुख शिक्षक भिवगडे, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक समरीत , विज्ञान शिक्षक येरणे उपस्थित होते. विज्ञान शिक्षक येरणे यांनी विज्ञान प्रयोगशाळा तसेच त्यातील सर्व उपकरणांची विद्यार्थ्यांना माहिती दिली व विज्ञानाचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. आजचा शनिवार मुलांना खूप आवडला.एवढी छान परिसर भेट घडवून आणल्याबद्दल जि.प.प्राथमिक शाळा तोंडलीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्र शाळा धानोलीच्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.आजचा शनिवार खरच आनंददायी ठरल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.