नागपूर :- वाचन प्रेरणा दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धेत रुपाली उगे, प्रश्नमंजुषा स्पर्धेत मंगेश मेश्राम तर काव्यवाचन स्पर्धेत शिल्पा निमकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागुल, सहाय्यक आयुक्त हरीश भामरे, मराठी भाषा संचलनालयाचे विभागीय उपसंचालक हरेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल सहाय्यक मंगेश मेश्राम यांना प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहायक पोलिस निरीक्षक मृणालिनी वंजारी यांनी व्दितीय तर भंडारा येथील अपर कोषागार अधिकारी प्रविण पत्की यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
निबंध स्पर्धेत माहिती व जनसंपर्क विभागाच्या लेखा लिपीक रुपाली उगे यांनी प्रथम, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलिस निरीक्षक मृणालिनी वंजारी यांनी व्दितीय तर माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या कविता बोरीकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कवितावाचन स्पर्धेत पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहायक पोलिस निरिक्षक शिल्पा निमकर यांनी प्रथम, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी द्वितीय तर लेखा लिपीक रुपाली उगे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विभागीय आयुक्त बिदरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
तहसिलदार डॉ. हंसा मोहने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. महाराष्ट्र अध्यापक महाविद्यालयाचे शैलेश गायकवाड, वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रा. डॉ पल्लवी कर्वे, भाषा संचालनालयाच्या स्नेहा पुनसे आदी यावेळी उपस्थित होते.