नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन कालावधीकरिता सचिवालयात लिपिक टंकलेखकांची एकूण १० पदे एस-६ (१९९००-६३२००) या वेतनसंरचनेनूसार व अधिक नियमानुसार मिळणाऱ्या भत्यासह तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. व इंग्रजी टंकलेखक ४० श.प्र.मी. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
खुला संवर्गासाठी वय १८ ते ३८ वर्ष, मागास वर्गासाठी वय १८ ते ४३ वर्ष (५ वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) राहील. ज्या उमेदवारांनी लिपिक-टंकलेखक या पदाकरिता अर्ज केला आहे अशा सर्व उमेदवारांची टंकलेखन चाचणी १२ डिसेंबर (गुरुवार) रोजी सकाळी ११.३० वाजता विधानभवन नागपूर येथे घेण्यात येईल.
सर्व उमेदवारांनी चाचणीसाठी येताना सोबत मूळकागदपत्रासह फोटो, जात प्रमाणपत्र, टी.सी, मार्कलिस्ट व इतर शैक्षणिक घेवून वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.