गुप्ता कोल वाशरी जवळ दोन युवकाला माराहण

पोस्टे ला पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस चार कि मी अंतरावर वराडा शिवार येथील गुप्ता कोल वॉशरी जवळ पाच आरोपींनी दोन युवकाला माराहण करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी दामीश खान यांच्या तक्रारीने पोस्टे कन्हान ला ५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.३०) नोव्हेंबर ला दामिश रशीद खान वय ३८ वर्ष राह. नागपुर हा सकाळी ९ वाजता दरम्यान वाळु साठयांच्या कामावर गेला असता त्यांचा सोबत कंपनीचे दिवाणजी प्रशांत वय ३२ वर्ष आणि पाॅकलैंड ऑपरेटर अविकाश वय २५ वर्ष असे तीन लोक होते. दुपारी ३ वाजता दरम्यान इको स्पोर्ट कार ने आरोपी १) राजु धरोड वय ३२ वर्ष राह. कांद्री, २) शिव हाटे वय ४५ वर्ष राह. कामठी,३) प्रज्वल हरणे वय २२ वर्ष राह. कामठी व इतर दोन असे पाच लोक अविकाश यांचा जवळ गेले असता त्याला हातबुक्कीने माराहण करून पाॅकलैंड मधुन खाली उतरविले. त्यानंतर पाचही आरोपी दामिश यांचे जवळ येऊन शिव हाटे याने दंड्याने व चौघाने हात बुक्कीने मारायला सुरवात केली. राजु धरोड याने दामिश यांचा जवळची पाण्याची बोटल त्यांच्या डोक्यावर मारली. आणि दामिश च्या मालिक तब्रेज यांस म्हटले कि तुझे और तेरे मालिक को गोली मार दुंगा. असे म्हटले असता शिव हाटे यांचा टी-शर्ट थोडा वर केला तर त्याच्या कमरेला पिस्तुला सारखे काहीतरी शस्त्र दिसले. आरोपींनी दामिश यांस वाहना मध्ये टाक ण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दामिश हा घटनास्थळा वरू न पळ काढला. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसां ना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून जख्मी दामिश याला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे उपचाराकरिता आणले असता तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन मेडिकल रुग्णालय नागपुर येथे रेफर करण्यात आले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी दामिश खान यांचा तक्रारी वरून पोस्टे ला पाच आरोपी विरूध्द कलम ३२३, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरी क्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PENDING ISSUES OF TRADERS SHOULD BE RESOLVED ON PRIORITY- Dr. DIPEN AGRAWAL

Mon Dec 5 , 2022
STATE GOVERNMENT IS RESPONSIVE TOWARDS ISSUES OF TRADERS – EKNATH SHINDE Nagpur :-At the outset Dr. Dipen Agrawal, President of Chamber of Associations of Maharashtra Industry and Trade (CAMIT) welcomed Chief Minister, Eknath Shinde with a floral bouquet in prominent presence of  Krupal Tumane MP, Ramtek and submitted memorandums highlighting harassment of traders by Local Body Tax department across the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com