दुचाकी चोर तीन आरोपी पकडुन दुचाकी जप्त..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 स्थागुशा नागपुर ग्रामिण पथकाची कारवाई.   

कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथ कास कन्हान पोस्टे अंतर्गत चोरीच्या गुन्हयातील आरो पीची गुप्त माहिती मिळाल्या वरून कोळसा खदान न. ६ येथील तीन आरोपीना पकडुन त्यांच्या ताब्यातुन चोरीची दुचाकी जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले.

मंगळवार (दि.३) ऑक्टोंबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गुप्त बातमीदारा कडुन तीन संशयित इसमा बद्दल महिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सापळा रचुन आरोपी १) अमन बीसनदेव सहानी वय २१, २) युनुस सिराज खान वय २० वर्ष, ३) दीपक रामबच्चन गोसावी वय २४ तिन्ही रा. वेकोलि कोळसा खदान न. ६ याना ताब्यात घेत त्याचे ताब्यातुन चोरी केलेली एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेलडर दुचाकी क्र. एमएच ४० ए २२०७ किंमत ५०,००० रूपये जप्त करून पोस्टे कन्हान येथील अप.क्र.६३९/२३ कलम ३७९ भादंवि. अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने आरोपी क्र.१ ची वैद्यकिय तपासणी करुन जप्त मुद्देमाल व कागदपत्रंसह पोलीस स्टेशन कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सपोनि बट्टूलाल पांडे, पोहवा विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, प्रमोद भोयर , नापोशी संजय सनोदिया , चापोहवा शुक्ला हयांनी शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोरवाल कॉलेज टी पॉईंट चौकात 12 हजार 300 रुपयाची चोरी.

Wed Oct 4 , 2023
  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोरवाल कॉलेज टी पॉईंट चौकातील एका चष्म्याच्या दुकानातुन अज्ञात चोरट्याने 5हजार रुपये किमतीचे 100 चष्मे,चार हजार रुपये किमतीच्या 40 परफ्युम च्या बॉटल,3 हजार रुपये किमतीच्या सिगारेट पॉकेट, 300 रूपयाची चिल्लर असे एकूम 12 हजार 300 रुपयांची चोरी झाल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी चेतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!