अरोली :- बाबदेव – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या गट ग्रामपंचायत अंजनगाव अंतर्गत येत असलेल्या ईसापुर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या 31 जानेवारी शुक्रवारपासून दोन दिवसीय मंडईची सुरुवात दुपारी दोन वाजता आमदंगल ने होणार आहे.
शुक्रवारी रात्रीला मराठी लावणी नागपूर यांच्या लावणीच्या कार्यक्रम, एक फेब्रुवारी शनिवारला सकाळी नऊ वाजता पासून शाहीर जयकुमार राहानगडाले आणि शाहीर उरमिला कवडू साथी मनोज खडसे यांच्या दुय्यम राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्यामकुमार बर्वे ,माजी आमदार टेकचंद सावरकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष रामटेक तालुका शिवसेनाप्रमुख विशाल बरबटे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नरेश मोटधरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, देवेंद्र गोडबोले ,शालिनी शेषराव देशमुख ,अंजनगाव सरपंच चिंतामण सारवे, उपसरपंच प्रफुल मेहर ,पानमारा सरपंच संजय बाराई, मौदा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, सरपंच तारसा वैशाली आनंद लेंडे, नागपूर जिल्हा ग्रामीण संचालक बाळकृष्ण खंडाईत, एलआयसी सल्लागार विनोद पाटील ,भाजपा कार्याध्यक्ष रमेश कुंभलकर ,माजी पंचायत समिती सदस्य कीर्ती वीरेंद्र पायतोडे, पूनम मंगेश तिघरे, यादव ट्रेडर्स मौदाचे मनिराम यादव, माजी सरपंच नीता प्रदीप पोटफोडे पोलीस पाटील सुवर्णा नामदेव डोंगरे, माजी पोलीस पाटील कल्याण जाणे, बाबदेव साईनाथ ट्रेडर्सचे प्रवीण कारेमोरे, महावितरण नागपूरचे माजी अध्यक्ष बळवंत डोंगरे ,सामाजिक कार्यकर्ता श्रीराम जाणे, भारतीय माजी सैनिक ईसापुर अजय डोंगरे, ईश्वर वैरागडे, रामराव डोंगरे, एलआयसी सल्लागार खेमचंद मेहर सह गावातील, परिसरातील, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी, मान्यवर उपस्थित राहणार असून या मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान आमदंगलचे पंच सेवक गडे, प्रीतम बावनकुळे, जितेंद्र नारनवरे, अध्यक्ष धनराज मेहर, निरंजन शेंद्रे, शिवशंकर मस्के, उपाध्यक्ष टेकचंद मेहर ,अनुराग कुंभलकर, दिनेश शेंद्रे, सचिव अमित कुंभलकर, दत्तू करडभाजणे, जगन वैरागडे, सचिव गौतम डोंगरे, अमोल मेहर, राजकुमार मेहर सह समस्त पदाधिकारी व सदस्य गण व ग्रामवासी ईसापुर यांनी केले आहे.