मतदान पथकांचे दोन दिवसांचे पहिले पूर्वप्रशिक्षण संपन्न

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहीर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार ६७ – आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात आरमोरी विधानसभा मतदार संघामधील मतदान पथकांकातील एकूण १६०० अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता Theory व EVM/VVPAT Hands On पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवन नगर परिषद, देसाईगंज येथे करण्यात आलेले होते.

सदर प्रशिक्षणामध्ये मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडव्याच्या कामगिरीबाबत रणजीत यादव (भा.प्र.से.) उपविभागीय अधिकारी कुरखेडा, प्रिती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज, उषा चौधरी तहसीलदार आरमोरी, यांचे द्वारा प्रशिक्षणाचे माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारा EVM/VVPAT Hands On चे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान पथकातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी EVM/VVPAT ची प्रत्यक्ष हाताळणी केली. व त्यांचेकडून मतदान यंत्र हाताळणी व सिलिंग प्रक्रिया याबाबत तसेच मतदानाचे दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता कोणतीही अडचण येणार नाही असे प्रमाणपत्र घेण्यात आले. याकामी ६७ – आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील ३४ क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे द्वारा विचारण्यात आलेल्या शंकांचे निराकरण वेळीच करण्यात आले. मतदान पथकांचे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी व फार्म नं. १२ (Postal Ballot) व फार्म नं.१२ A (EDC) भरून घेणेकरीता एकूण १६ टेबल ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदान पथकातील अधिकारी / कर्मचारी यांना मतदार यादितील नाव शोधण्याकरिता मतदान कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में सतर्कता जागरूकता सप्ताह का शुभारंभ

Mon Oct 28 , 2024
नागपूर :- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में आज दिनांक 28.10.2024 को सतर्कता जागरूकता की शपथ के साथ सतर्कता जागरूकता सप्ताह 2024 का शुभारंभ हुआ। वेकोलि मुख्यालय में आयोजित सतर्कता जागरूकता सप्ताह 2024 के कार्यक्रम में, मुख्य अतिथि जे. पी. द्विवेदी, सीएमडी, वेकोलि ने कर्मियों को सतर्कता जागरूकता की शपथ दिलाई। इस अवसर पर निदेशक तकनीकी (संचालन तथा योजना एवं परियोजना) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com