नागपूर :- भटके विमुक्त कल्याणकारी बहुद्देशीय संस्था तथा भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत च्या वतीने दोन दिवशीय बिऱ्हाड परिषदेचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, विदर्भ प्रांत संघचालक दिपक तामशेट्टीवार व अखिल भारतीय घुमंतू कार्य प्रमुख दुर्गादास व्यास यांच्या उपस्थितत करण्यात आले.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भटके जाती-जमातीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनतुन कृतीआराखडा बनवन्यात येईल. त्या माध्यमातून शिक्षण, रोजगार आरोग्य या त्रिसूत्री वर भर देऊन भटके जाती-जमातीच्या रोजगार व्यवसायवाढीसाठी मदत केले जाईल. येणार महाराष्ट्र अर्थसंकल्पसंकल्पत भटके जाती-जमातीच्या विकासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन विशेष पॅकेज घोषित करू, अशी घोषणा आदिवासी मंत्री अशोकराव उईके यांनी केली. भटके जाती-जमाती समाज हा सनातन हिंदू संस्कृतीचा वाहक आहे व हा समजा विकासापासून कोसो दूर असल्यामुळे तो वंचित आहे त्यासाठी त्यांच्या पाड्यावर, पालघरा वरच आयुष्यमान भारत व जातं प्रमाणपत्रे वितरित केले जातील असे पण त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या शुभांगी तापट यांनी समजसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून समाजातील सर्व घटकाचा विकास होणे गरजेचे आहे. भटके जाती-जमातीच्या लोकांना शिक्षणा द्वारे त्यांच्या परंपरागत कौशल्यांची गुणवत्ता वादवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात हिंदू ऐक्या करिता व सशक्त भारतासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
विदर्भ प्रांत संघचालक दिपक तामशेट्टीवार यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि समजा ठेवाच परिपूर्ण होऊ शकतो जेव्हा एक विकसित समाज दुसऱ्या वंचित समाजासाठी झटत असतो. भटके जाती-जमातीच्या लोकाच्या उत्कर्ष होण्याकरिता जेव्हा विकसित समाजबांधव माझं कर्तव्य-जबाबदारी या भावनेने सामोरे येणार तेव्हा आपली दुर्बलता व परावलंबीत्व कमी होऊन स्मार्ट हिंदू राष्ट्र निर्माण करू शकतो, असा विचार त्यांनी मांडला.
दोन दिवशीय बिऱ्हाड परिषदेत समाजाच्या समस्या व उपाय यावर चिंतन होणार असून त्याचा अहवाल हा महाराष्ट्र शासनाला सादर केला जाईल. नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर व महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी सुद्धा भेट दिली.
उदघाटना कार्यक्रमा चे प्रास्ताविक श्रीकांत तिजारे तर आभार शेखर बोरसे यांनी केले.