विभागीय लोकशाही दिनात दोन तक्रारी

नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा एकूण दोन तक्रारी प्राप्त झाल्या. या दोन्ही तक्रारींबाबत संबंधित विभागांनी चौकशी व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करावे आणि तातडीने विषय सोडवावा अशा सूचना उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी आज दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचार संहितेमुळे विभागीय लोकशाही दिन स्थगीत ठेवण्यात आला होता. यानंतर आज विभागीय आयुक्त कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेण्यात आला.

पोलीस, महसूल, महिला व बालविकास आदी विभागांचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत नरखेड तालुक्यातील लोहारा आणि भंडारा जिल्ह्यातील कोटांगले येथील नागरिकांच्या तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या. तक्रारींबाबत संबंधित विभागांनी चौकशी व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करत तातडीने विषयाचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर मनपात भरण्यात आली पदोन्नतीची पदे 

Mon Jun 10 , 2024
– अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदोन्नतीची पदे भरण्यात आली असुन आश्वासीत प्रगती योजनेमधील कर्मचा-यांच्या मागण्यांची पुर्तता केल्याने मनपातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांचे आभार मानले आहेत. मागील बरेच वर्षांपासुन चंद्रपूर मनपाच्या आस्थापनेवरील गट – अ ते गट – ड संवर्गातील विविध पदे रिक्त होती त्यामुळे मनपा प्रशासकीय कामावर विपरीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com