टिपर मोटारसायकल अपघातात दोघां मुलांचा मृत्यू तर वडीलावर उपचार सुरू

अमरदिप बडगे

– टिपर सह चालकास पोलिसानी केली अटक

 गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बस स्थानक परिसरात काल सायंकाळी 7:30वाजे दरम्यान टिप्पर क्रमांक MH 40 AK 6323 ने भरधाव वेगाने गाडी चालवत मोटारसायकल क्रमांक MH 36 P 6585 धडक दिल्याने 2 मुलांचा मृत्यू  तर वडील जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

अपघात हा मुंडी कोटा बस स्थानक परिसरात झाला असुन एक मुलगा पियुष सुरेश कांबळी वय 12 वर्षे राहणार घाटकुरोडा यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा धुरुप सुरेश कांबळी वय 15 वर्ष याला भंडारावरून नागपुरला उपचारासाठी नेत असतानाच खरबी गावाजवळ वाटेतच रात्रीला मृत्यू झाला आहे.या दोघांचे शव तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता नेण्यात असून वडील सुरेश कांबळी वय 40 वर्ष यांचा भंडारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदर टिपर चालक प्रीतम ताराचंद तुमसरे याला  टिप्परसह अटक तिरोडा पोलिसांनी केली आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अवैध मुरुम परिसरात सुरू असून भरधाव वेगाने गाडी चालक रस्त्याने चालवत असतात.काल मृत झालेले दोन्ही भावंडं गेल्याने कांबळी परिवार सह घाटकुरोडा गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रामनगरातील फुल दुकानांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

Thu Jun 30 , 2022
नागपूर : नागपूर महानगपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत बुधवारी (ता.२९) रामनगर चौकातील फुल दुकानांवर कारवाई करण्यात आली.             धरमपेठ झोन अंतर्गत सहायक आयुक्त  प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात झोनमध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी अतिक्रमण विभागाद्वारे गोकुलपेठ बाजार तसेच रामनगर चौकातील हनुमान मंदिराजवळील फुटपाथ आणि रस्त्यावर असलेली फुलांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com