संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन दुचाकी, ६ बोरी कोळसा असा एकुण ३८००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलिस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली खदान नंं. ३ चा ६ बोरी कोळसा चोरी करून दोन दुचाकीवर नेताना दोन आरोपीना वेकोलि सुरक्षा रक्षकांनी पकडुन ३८००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे तक्रार केल्याने दोन्ही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला.
फराज अहमद इस्तेखार अहमद वय २४ वर्ष वेकोलि कामठी खुली खदान सुरक्षा रक्षक रा.जे.एन रोड वारिसपुरा कामठी मागिल १७ महिन्या पासुन सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असुन मंगळवार (दि.५) मार्च २०२४ ला सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजे पर्यंत द्वितीय पाळीत कर्तव्यावर असताना वेकोलि नविन उपक्षेत्र कार्यालय खंदान नं.३ मध्ये सायंकाळी ४.३० वाजता सुरक्षा इंचार्ज संतोष इंद्रजीत यादव हयानी २ इसम कोळसा बोरीत भरून दुचाकीवर बांधुन चोरी करून नेताना पकडले यात १) अमीन अशरफ सय्यद वय २८ वर्ष रा. शिवनगर कांद्री वार्ड क्र.४ यांचे जवळु न दुचाकी क्र. एमएच ४० बी ६९९५ किमत २०००० रूपये, ३ बोरी कोळसा अंदाजे २५० किलो किमत १५०० रूपये, २) योगेश हिरदेश प्रजापती वय २४ वर्ष रा. शिवनगर कांद्री वार्ड क्र. ४ याची दुचाकी क्र. एम एच ४० – ५०८८ किमत १५००० रुपये, ३ बोरी कोळ सा अंदाजे २५० किलो, किमत १५०० रुपये, असे दोघा जवळील २ मोटर सायकल आणि त्यावरील ६ बोरी कोळसा अशा एकुण किमंत ३८००० रुपयाचा मुद्देमाल संतोष इंद्रजीत यादव हयानी चोरी करून नेताना पकड़ुन कायदेशीर कार्यवाही करिता वेकोलि सुरक्षा रक्षक फिर्यादी फराज अहमद इस्तेखार अहम द यांचे तक्रारीवरून कन्हान थानेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी आरोपी अमीन अशरफ सय्यद आणि योगेश हिरदेश प्रजापती यांचे विरूध्द कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.