रामटेक :- रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर आध्यात्मिक संत होते. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. संत तुकडोजी महाराजांचा सुरुवातीचा काळ हा रामटेक, सालबर्डी, रामधीघी आणि गोन्दोडाच्या खोल जंगलात गेला होता. त्यांचा संचार हा प्रामुख्यानं महाराष्ट्रातील विदर्भात असला तरी त्यांनी संपूर्ण भारतभर आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलं. आज ११४ व्या जयंती निमित्ताने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीला महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. उर्मिला नाईक, प्रा.चेतना ऊके, प्रा.निकिता अंबादे, प्रा.गंगा मोंढे, प्रा.डाॅली कळमकर, प्रा.शालू वानखेडे, प्रा.किरण शेंद्रे, प्रा.कला मेश्राम, प्रा.मयुरी टेंभुर्णे, गीता समर्थ, प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.देवानंद नागदेवे, अतुल बुरडकर, सुरेश कारेमोरे, राजेंद्र मोहनकर, संदीप ठाकरे, जयश्री कामडी, राष्ट्रपाल मेश्राम, शामलाल मेश्राम हे उपस्थित होते.