नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ३० नोव्हेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४४ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मंगळवारी ३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com