नागपूर :- भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतियेळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.