मनपात ‘पंच प्रण प्रतिज्ञा’ घेत केले वीरांना वंदन

– समाजातील प्रत्येकाला सोबत घेऊन अभियानाला यशस्वी करा : मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

आयुक्तांच्या हस्ते ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा थाटात शुभारंभ

नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा बुधवार ता. ९ ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेत थाटात शुभारंभ करण्यात आला. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान यशस्वी करा असे आवाहन केले.

याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पृथ्वीराज बी.पी., मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यास अनुसरून मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हातात माती/दिवा घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली व त्यानंतर सेल्फी काढली. अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांनी समस्त कर्मचाऱ्यांना पंच प्रण प्रतिज्ञा दिली. नंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते भारतीय लष्करात आपले कर्तव्य बजावणाऱ्या, कारगिल युद्धात सहभागी व सध्या मनपाच्या उपद्रव शोध पथकात कार्यरत वीर जवान कॅप्टन(नि.) संजय खंडारे, हवालदार(नि.) अरविंद बघेल, सुभेदार(नि.) जगतराम ब्राह्मणकर यांचा सत्कार करण्यात आला. आयुक्तांच्या हस्ते मनपाचा मनाचा दुपट्टा आणि सन्मानचिन्ह देऊन वीर जवानांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, अभियानाचे नोडल अधिकारी सुरेश बगळे, निगम सचिव प्रफुल्ल फरकासे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांच्यासह मनपाचे व स्मार्ट सिटीचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा समस्त नागरिकांकरिता अभिमानाचा पर्व आहे. केंद्र शासनाने ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह निर्देशित केलेले ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान संपूर्ण शहरात राबविण्यात येणार असून, मनपाची संपूर्ण यंत्रणा ही या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पूर्णतः सज्ज आहे. नागरिकांनी देखील या अभियानात सहभागी होत, अभियान यशस्वी करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी यावेळी केले.

‘मेरी माटी,मेरा देश’ अभियान करीत शहरातील ७५ ठिकाणी सेल्फी स्टॅन्ड/पॉईंट लावण्यात आले आहे. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर देखील सेल्फी स्टॅन्ड व पॉईंट उभारण्यात आले आहेत. पंच प्रण प्रतिज्ञा घेतल्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात माती आणि दिवा घेत मोठ्या उत्साहात सेल्फी काढीत मातीला वंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे " माझी माती माझा देश " अभियानाची सुरवात क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना करण्यात आले वंदन

Wed Aug 9 , 2023
चंद्रपूर  :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच ९ ते ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानाची सुरवातही करण्यात आली. प्रारंभी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र, माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!