नागपूर :- गोंडवाना थीम पार्क तैयार करा अन्यथा संघटने तर्फे गोरेवाडा येथे आमरण उपोषन आदिवासी समाजाच्या अस्मितेचे केंद्र असलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय नागपुरला ‘’गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय गोरेवाडा नागपुर ‘’असे नाव द्या या विषयाला धरुन २६ जानेवारी २०२१ ला रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ, नागपुर तर्फे व आदिवासी समाजाचे भव्य घरणे आंदोलन नागपुर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह उईके यांच्या नागपुर विधान भवन स्तिथ स्मृतीस्थळी करण्यात आले होते. परंतु गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय नागपुर याला स्व. बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले व आदिवासी समाजाची दिशाभुल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “गोंडवाना थीम पार्क” उभारु अशी घोषणा केली परंतु महाविकास आघाडी सरकारला या विषयाचा विसर पडला होता. आता नवीन सरकार मधे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणविस विराजमान झाले आहेत व त्यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी आहे. नागपुर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर मार्फत उपमुख्यमंत्री यांना संघटने तर्फे निवेदना मार्फत विविध मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष आकाश मडावी, महासचिव मयुर कोवे, उपाध्यक्ष सागर इवनाते, उपाध्यक्ष निलेश धुर्वे, गौरव धुर्वे, पुजा सिरसाम, प्रतीक मरकाम आदि पदाधिकारी उपस्तिथ होते. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय नागपुर या नावात किंचित बदल करुन या पार्कचे नाव ‘’गोंडवाना’’ बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय गोरेवाडा नागपुर असे ठेवण्यात यावे. सदर झुलॅाजिकल पार्क एकुण २००० एकर जागेवर असुन त्या जागेत फक्त २ हेक्टर जागा गोंडवाना थीम पार्क साठी उपलब्ध करण्यात आलेली आहे.ही जागा थीम पार्क करिता अत्यल्प असुन त्याऐवजी एकुण २० हेक्टर जागा गोंडवाना थीम पार्क करिता उपलब्ध करुन देण्यात यावी. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनेशनल झुलॅाजिकल पार्क,नागपुर आणि गोंडवाना थीम पार्क या दोन्ही प्रकल्पात स्थायी/अस्थायी/कंत्राटी या पदावर आदिवासी बांधवांची निवड करण्यात यावी. गोंडवाना थीम पार्क च्या समिति मधे दोन आदिवासी सदस्यांऐवजी पाच आदिवासी सदस्यांची निवड करण्यात यावी. गोंडवाना थीम पार्क मधे आदिवासी बांधवांकरिता सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक उत्सव कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असावी. गोंडवाना थीम पार्क मधे भव्य व्यासपीठ निर्माण करण्यात यावे. मागण्या पूर्ण न झाल्यास बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनेशनल झुलॅाजिकल पार्क, नागपुर समोर आमरण उपोषन करणार असा इशारा निवेदना मार्फत करण्यात आला.