नागपूर :- बिरसा सेवा फाऊंडेशन आणि जय पेरसापेन आदिवासी महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारीला गोंडवाना विकास मंडळ तुकडोजी पुतळा नागपूर येथे आदिवासी सामाजिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवडू गेडाम व इंदिरा कोडापे यांची उपास्थिती होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन राघव सराटे लेखक प्रमुख अतिथी एन.झेड.कुमरे, डॉ.बलवंत कोवे, अनिल पेंदोर, ॲड. राजश्री इवनाते, प्रकाश मडावी, जान्हवी मडावी, यांची यावेळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मास्टर कबीर केराम व लावण्या यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते यांनी सोशल अवरनेस, सोशल रिफॉर्म, सोशल सायन्स, स्किल डेव्हलपमेंट आणि येणाऱ्या समस्या, जसे व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्व आदिवासी समाजाला समाजाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आदिवासी यूवक व युवतीला येणाऱ्या समस्यांना कशी मात करावी याबाबत मार्गदर्शन केले. आणि बिरसा सेवा फाउंडेशन मार्फत या कार्यक्रमात अजय मसराम यांनी गीता द्वारे सामाजिक प्रबोधन केले. छाया धुर्वे कवियत्री यांनी आदिवासी परिस्थिती बाबतची कविता सादर करून जागृत केले. तसेच गणेश परतेकी यांनी आदिवासी संस्कृती व शिक्षणाचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून समाजा समोर मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीएसएफचे ज्ञानेश्वर सयाम, राजू मडावी, रामलाल कोकर्डे, श्याम सराटे, आर आर कुळसंगे, राजेंद्र पोयाम, विठ्ठल मसराम, विष्णूजी सिडाम, सिताराम केराम, ललितकुमार परतेकी, विनोद केराम, गणेश जुमनाके, गुणवंत आतराम, राजू पेंदोर, महिला बचत गटांच्या श्रीमती चित्रलेखा गेडाम, शशिकला धुर्वे, रश्मी मडावी, माया टेकाम, भूमिका गेडाम यांची या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती होती. प्रास्ताविक शाम सराटे यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर सयाम यांनी तर आभार राजू मडावी यांनी मानले.