संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- संत तुकडोजी महाराजांनी सांगीतल्यानुसार ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही म्हण कायम लक्षात घेत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा यावर केम ग्रा प तर्फे भर देण्यात येत असल्याचे मौलिक प्रतिपादन केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे यांनी केम ग्रा प येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच नरेश महाल्ले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नरड, नरेंद्र फलके,शीतल पंचबुधे,शारदा खंडाळे, सचिव विकास शहारे, पशु डॉकटर टेभरे , गावातील नागरिक चंद्रभान दारोटे, रुपेश अतकरे, प्रशांत खंडाळे ग्राम पंचायत कर्मचारी विष्णू देऊळकर आदी उपस्थित होते.