संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 11:-ढासळत चाललेल्या वातावरणाचा वाढता दुष्परिणाम लक्षात घेता ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतूमध्ये बदल होत चालला आहे तेव्हा वातावरणाच्या संगोपनासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर यांनी प्रबुद्ध नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण परिसरात महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम क्रीडा व युवक सेना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर जिल्हा तसेच तक्षशिला महिला विकास संस्था प्रबुद्ध नगर कामठी च्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावून करण्यात आले.याप्रसंगी विनोद बोरकर, संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई सातपुते, सचिव करिश्मा मेश्राम, मोहन सातपुते,योगी सातपुते, खुशाल भवसागर,आयुष येवले, राजेश वाघमारे, नितेश गजभिये,पुणेश नगरारे, विनोद चव्हाण,अशोक भोयर, छबी वंजारी, विशाखा भोतकर,नीता कांबळे, झोडापे,फकिर्डे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज-माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com