नागपूर :- शहर अंतर्गत ऑटोचालक क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहुन नेतात व अधिकृत पार्किंग मध्ये ऑटो पार्क न करता वाहतुकीच्या मार्गावर अस्ताव्यस्त उभे करतात तसेच ई-रिक्षा यांना शहरातील मुख्य मार्ग 1) वाडी ते वर्डी, 2) बर्डी ते सी.ए. रोड मार्गे भंडारा रोड (पारडी नाका), 3) बर्डी ते कामठी रोड (जबलपुर रोड), 4) वर्डी ते छत्रपती चौक (वर्धा रोड), 5) संपुर्ण रिंग रोड, 6) बर्डी ते हिंगणा, 7) वर्डी ते काटोल नाका, 8) बर्डी ते सावनेर रोड (छिंदवाडा), 9) बर्डी ते नंदनवन, 10) बर्डी ते हुडकेश्वर, 11) बर्डी ते वेसा, 12) सर्व मुख्य महामार्ग, 13) सर्व मुख्य राज्य मार्गावर तसेच उड्डाणपुलावर वाहतुकीस मनाई असुन सुध्दा या मार्गावर वाहतुक करतात, ज्यामुळे नमुद मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होवुन नागरिकांना त्रास होत असल्या बाबतच्या तकारी प्राप्त आहेत. तसेच नागपूर शहरातील शाळा सुरू झालेल्या असुन, शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे ऑटो व ई-रिक्षा मध्ये विद्यार्थ्यांना कोंबुन बसवुन वाहतुक करतात त्यामुळे एखादा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
करीता वाहतुक विभाग, नागपूर शहर तर्फे दिनांक 25.06.2024 पासुन संपूर्ण नागपूर शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. ज्यामध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रवासी व विद्यार्थ्यांना वाहुन नेणारे, वाहतुक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ऑटो चालकांवर 1627, तसेच ई-रिक्षा चालकांवर 814 असे एकुण-2441 चलान कारवाई करण्यात आलेली असुन, सदर मोहिम नियमित राबविण्यात येणार आहे.