गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था , मुंबई यांच्या आदेशासूचना नुसार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय ,गडचिरोली यांच्या वतीने दि. १२/१२/२०२४ रोजी प्रशिक्षण केंद्र नर्सिंग स्कूल ,सामान्य रुग्णालय ,गडचिरोली या ठिकाणी एच.आय.व्ही / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा – २०१७ अंतर्गत तक्रार अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
एच.आय.व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी एच.आय.व्ही / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा – २०१७ हा सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण भारतात लागू झाला . या कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्येक विभागाच्या आस्थापनामध्ये तक्रार अधिकारी नेमण्याची तरतूद कलम – २१ मध्ये नमूद केली आहे . एच.आय.व्ही / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा – २०१७ हा महाराष्ट्र शासन राजपत्रात २८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला.
धोरणांचे उद्दिष्टे :-
१) एच.आय.व्ही संक्रमित आहे म्हणून नोकरीच्या ठिकाणी, शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणी व हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान भेदभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
२) एच.आय.व्ही संक्रमित आहे म्हणून त्याची इच्छा नसतांना माहिती उघड करणे / सांगणे कायद्याने गुन्हा आहे.
३) एच.आय.व्ही संक्रमित आहे म्हणून संपत्ती पासून बेदखल करणे कायद्याने गुन्हा आहे .
४) एच.आय.व्ही तपासणी स्वै स्वैच्छिक आहे आणि तपासणी करण्यापूर्वी संमती घेणे गरजेचे आहे.
या बद्दल सम्पुंर्ण मार्गदर्शन देऊन प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , गडचिरोली येथील Adv. अरुण अन्जंकर व बालाजी बावणे आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय ,गडचिरोली चे DPO महेश भांडेकर , डॉ. अभिषेक गव्हारे CSO आणि विविध विभागामधील तक्रार अधिकारी उपस्थित होते.