संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्य सरकारने गोवंश तस्करीवर प्रतिबंध केले असले तरीही या गोवंश तस्करी व्यवसायीकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अजूनही पूर्णता यशप्राप्त आलेले नाही उलट पोलिसांची दिशाभूल करून नवनविन अकल लढवीत हा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यानुसार आज अम्ब्युलेन्स द्वारे गोवंश जनावराची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांना मिळताच पोलिसांनी यशस्विरित्या सापळा रचून कमसरी बाजार मार्गे अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेणाऱ्या अम्ब्युलेन्स वर यशस्वीरीत्या धाड घातली.या धाडीतून 8 गोवंश जनावरे ताब्यात घेत कत्तलखान्यात कत्तलीसाठी जाणारे हे वाहने पोलिसांनी सुरक्षितरित्या पारडी च्या गोरक्षण शाळेत हलविले.ज्यामुळे पोलिसांनी 8 गोवंश जनावरांना जीवनदान दिले.दरम्यान अंधाराचा फायदा घेत आरोपी वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले.या धाडीतून जुनी कामठी पोलिसांनी 8 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 20 हजार रुपये,फोर्स कंपनीचे अम्ब्युलेन्स क्र एम एच 34 सी व्ही 2565 किमती 8 लक्ष रुपये असा एकूण 9 लक्ष 20 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करीत पसार आरोपी अम्ब्युलेन्स मालक,अँब्युलेन्स चालक व माल मालक विरुद्ध भादवी कलम (1)(ड)पशु अधिनियम सहकलम 5(ब)महाराष्ट्र प्राणी सुधारणा 83/177 मोटर वाहन कायदा सहकलम 119 मपोका अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम, एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ राखुंडे,डी बी स्कॉड चे श्रीकांत भिष्णूरकर,अमित ताजने,कुश ठाकूर,प्रमोद शेळके आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.